रणवीरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी हे मूर्खपणाचं असल्याचं म्हटलंय. बॉलिवूडमधून रणवीरला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. कोणत्याही सेलिब्रिटीनं त्याच्याविरोधात वक्तव्य केलं नाही. आता दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (vivek agnihotri) यांनी देखील रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा वैगेरे दाखल करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, असं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
रणवीरनं दोन -तीन दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक नग्न फोटो पोस्ट केला. या फोटोमुळं समाजाच्या सर्व स्तरांतून त्याच्यावर टीका करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेनं रणवीरविरोधात थेट पोलिसांत धाव घेतली. हा फोटो मासिकासाठी काढण्यात आला असून, त्याची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे मिळविण्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे समाजातील तरुण नीतिभ्रष्ट करण्याचा किंवा समाज बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. अशा कृत्यामुळं महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होत असून रणवीर याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अर्जाद्वारे या संस्थेने चेंबूर पोलिस ठाण्यात केली होती.
काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
रणवीरविरोधात एफआयआर दाखल करणं म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे. फोटोशूटमुळं वाद निर्माण व्हावा, असं काही यात नाही. काही कारण नसताना विरोध होतोय. गुन्हा दाखल करताना म्हटलंय की, रणवीच्या न्यूड फोटोमुळं महिलाच्या भावना दुखावल्यात. आता मी प्रश्न विचारतो की, महिलांचे इतके न्यूड फोटोशूट आपण पाहतो, तेव्हा पुरुषांच्या भावना नाही दुखावत का?
Home Maharashtra महिलांच्या न्यूड फोटोमुळं पुरुषांच्या भावना दुखावत नाहीत का? प्रसिद्ध दिग्दर्शक स्पष्टच बोलला...