Jitendra Awhad on Babasaheb Purandare controversy | ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि ते उपस्थित करणारा महाराष्ट्रातील पहिला राजकीय नेता अथवा इतिहासावर भाष्य करणारा मी होतो. ते प्रश्न विचारल्यानंतर पक्षातून अर्थातच माझ्यावर दबाव सुरु झाला. त्यावेळी माझा राजकीय बळी जाणार, असे मला वाटायला लागले होते.

हायलाइट्स:
- तू जे काही तुझ्या अभ्यासातून करतो आहेस ते तू कर
- हा विषय तू गेले अनेक वर्षे हाताळतो आहेस
- त्यामुळे तुला कोणाचे ऐकण्याची गरज नाही
या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट टाकत या संपूर्ण प्रकरणाची उत्पत्ती कशी झाली, त्याचा प्रवास कसा राहिला आणि सर्वप्रथम आपण याबाबत उपस्थित केलेले मुद्दे कसे बरोबर ठरले, यासंदर्भात भाष्य केले आहे. ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि ते उपस्थित करणारा महाराष्ट्रातील पहिला राजकीय नेता अथवा इतिहासावर भाष्य करणारा मी होतो. ते प्रश्न विचारल्यानंतर पक्षातून अर्थातच माझ्यावर दबाव सुरु झाला. त्यावेळी माझा राजकीय बळी जाणार, असे मला वाटायला लागले होते. म्हणून तातडीने मी शरद पवार साहेबांना फोन लावला. तसा मी मनातून प्रचंड घाबरलेलो होतो. मी पवार साहेबांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. तेव्हा शरद पवार यांनी माझे म्हणणे ऐकून घेत तू तुझ्या मार्गाने पुढे जा, असे सांगितले. त्यानंतरी शरद पवार जाहीर पत्रकारपरिषदांमध्ये माझी बाजू घेत होते. जितेंद्र आव्हाड जे बोलतोय ते योग्यच आहे अशी भूमिका ते घेत राहीले, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली.


२००४ साली सुरु झालेले हे प्रकरण आजही चालू आहे, आणि यामध्ये कायम मी एकमेव राजकीय नेता होतो त्यावेळेस कि, ज्याने उघडपणाने ब. मो. पुरंदरेंच्या विरोधात भूमिका घेतली. आणि आज मी अत्यंत अभिमानाने सांगतो कि, माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी कधीच मला बाजूला केले नाही. कधीच मला एकटे पाडले नाही. किंबहुना पक्षामध्ये अनेक जणांची वेगळी भूमिका असतांना एका छोट्याश्या बहुजन कार्यकर्त्याच्या बाजूने ते उभे राहीले हे मला आज महाराष्ट्राला सांगावेसे वाटते. पक्षातून दबाव असतांना, पक्षातील दुसऱ्या फळीचे अनेक नेते माझ्या मताच्या विरोधात असताना ते कायम माझ्या मागे सावलीसारखे उभे राहिले हे उभ्या महाराष्ट्राला मी स्पष्टपणाने सांगू इच्छितो, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network