तुर्की : तुर्कीस्थित विमान कंपनीच्या एका एअर होस्टेसने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून सर्वांनाच शाॅक बसला आहे. एअर होस्टेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विमानातील जेवणात सापाचे कापलेले डोकं पाहायला मिळत आहे. एअर होस्टेसचे म्हणणे आहे की, तिच्या भाजीमध्ये सापाचे कापलेले डोके सापडले आहे. ‘एव्हिएशन ब्लाॅग वन माईल अॅट अ टाइम’चा हवाला देऊन इंडिपेंडंटने या घटनेची माहिती दिली आहे.

एअरहोस्टेला अन्नात सापडले सापाचे डोके
वृत्तानुसार, ही घटना २१ जुलै रोजी तुर्कीमधील अंकाराहून जर्मनीतील डसेलडाॅर्फला जाणाऱ्या सनएक्सप्रेस फ्लाइटमध्ये घडली. एअर होस्टेसने दावा केला की, क्रु रात्रीचे जेवण करत असताना बटाट्याच्या भाजीमध्ये एका लहान सापाचे चिरलेले डोके आढळून आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सापाने कापलेले डोके फूड प‌ॅकेटमधील ट्रेच्या मध्यभागी पडलेले आहे. हा धक्कादायक व्हिडिओ समोर येताच प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता एका डिशमध्ये काही पदार्थ शिल्लक आहे. त्यातनीट पाहिलं तर सापाचं कापलेलं डोकं दिसतं आहे.

त्याचवेळी विमान कंपनीनेही या घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया दिली. आऊटलेटनुसार, सनएक्सप्रेस कंपनीच्या प्रतिनिधीने मीडीयाला सांगितलं की, ही घटना पूर्णपणे अस्वीकार्य आहे. या घटनेनंतर विमान कंपनीने अन्न पुरवठादारासोबतचा करार रद्द केला असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय तपासही सुरू करण्यात आला आहे. एका निवेदनात, एअरलाइनने म्हटलं आहे की, त्यांना विमान वाहतूक उद्योगात ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांच्या विमानावरील अतिथींना उच्च दर्जाची सेवा प्रदान करणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

त्याचवेळी विमान कंपनीनेही या घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया दिली. आउटलेटनुसार, सनएक्सप्रेस कंपनीच्या प्रतिनिधीने मीडियाला सांगितले की ही घटना पूर्णपणे अस्वीकार्य आहे. या घटनेनंतर विमान कंपनीने अन्न पुरवठादारासोबतचा करार रद्द केला असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय तपासही सुरू करण्यात आला आहे. एका निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की, ‘त्यांना विमान वाहतूक उद्योगात 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांच्या विमानावरील अतिथींना उच्च दर्जाची सेवा प्रदान करणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

विमान कंपनीची चौकशी सुरू
सनएक्स्प्रेला खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कॅटरिंग कंपनीनेही हे आरोप फेटाळले आहेत. आपण पदार्थ 280 डिग्री सेल्सियसवर शिजवतो. पण या पदार्थातील सापाचं डोकं तशा स्थितीत नाही. ते नंतर ठेण्यात आलं आहे, असा दावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here