मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर आता बऱ्याच नव्या मालिका सुरू होत आहेत. टीआरपी शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांना सतत नवं द्यावं लागतं. ‘बस बाई बस’ हा नवीन शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रसिद्ध महिला सहभागी होणार आहेत. अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे.

मुलाखत आणि गप्पांच्या या शोचा पहिला एपिसोड नुकताच प्रसारित झाला. या पहिल्या एपिसोडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सहाभागी झाल्या होत्या. सुप्रिया सुळेंनी राजकारणाच्या पलिकडच्या विषयांवरही मनमोकळेपणानं गप्पा मारल्या.

राजकारणात विरोधकांकडून होणारी टीका काही नवी नाही. सुप्रिया सुळेंवरही विरोधकांनी अनेकदा टीका केली. या टीकेला सुप्रिया ताईंनी त्यांच्या खास पद्धतीत उत्तरं दिली आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर यक्तिक स्वरुपाची टीका केली होती. त्यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं.
अशी आहे खान ब्रदर्सची लव्ह लाईफ! सलमाननं केलं नाही लग्न तर दोन्ही भाऊ घटस्फोटीत
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मला फार काही वाईट वाटलं नाही. कारण मी एक महिला आहे. एक होम मेकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे . घरी स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजतच नाही,विरोधक बोलतात ते काही मी मनाला लावून घेत नाही. असं सुप्रिया ताई म्हणाल्या.

या शोच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांना काय सांगाल असं विचारलं तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आजकाल केंद्राचा निधी मिळत नाही. मोदी साहेबांनी कट लावलाय. तुम्ही सांगा त्यांना आमचा निधी लवकर द्यायला. बाकी वहिनींना सांगा मी विचारलं म्हणून आणि लवकरच घरी जेवायला या तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल डीश बनवते.’, असं सुप्रिया म्हणाल्या अन् एकचहशा पिकला.

महिलांच्या न्यूड फोटोमुळं पुरुषांच्या भावना दुखावत नाहीत का? प्रसिद्ध दिग्दर्शक स्पष्टच बोलला
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
‘कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, अशी वैयक्तिक स्वरुपाची टीका चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here