अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. नुकतेच एका गाण्यासाठी मालिकेच्या कलाकारांनी नटूनथटून सेटवर हजेरी लावली. यावेळी मालिकेत एक गाणं दाखवलं जाणार आहे ज्यात सर्व कलाकार सजून गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहे. या गाण्याच शूटिंग नुकतंच झालं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
चंद्रकांत दादांच्या त्या टीकेवर सुप्रिया ताई स्पष्टच बोलल्या, स्वयंपाक करण्यात .
या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका देखील एकत्र आल्या आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
मराठी मालिकांमध्ये सध्या नवे ट्रेंड येताहेत. यामध्ये वयाच्या चाळीशीनंतर आयुष्यात येणारं प्रेम, त्यामध्ये येणारे अडथळे, त्यातून फुलणारं नातं हा फ्लेवर प्रेक्षकांनाही आवडतोय. एकीकडे सेकंड इनिंग दाखवत असताना मालिकेच्या तरुण प्रेक्षकांनाही खिळवून ठेवण्याचा फंडा वापरला जातोय. तू तेव्हा तशी या मालिकेला पसंती मिळतेय ती याच कारणामुळे.

अभिज्ञा भावेची वल्लीही भाव खाऊन जाता. नकारात्मक भूमिका साकारताना ती असं का वागत असेल, त्यामागे विचार काय असेल, ती व्यक्तिरेखा कशामधून जात असेल, याचा विचार करून ती पडद्यावर रंगवायचा प्रयत्न करत असल्याचं अभिज्ञा सांगते. वल्ली हे पात्र साकारतानाच्या अनुभवाबद्दल अभिज्ञाने सांगितलं, ‘हे पात्र नकारात्मक जरी असलं तरी ते विनोदीसुद्धा आहे. त्यामुळे खूप मजा येतेय आणि एक वेगळा आत्मविश्वास मिळतोय. संपूर्ण टीममुळे मला हे पात्र अधिक चांगल्या प्रकारे रंगवता येतंय.’
‘इमर्जन्सी’ मध्ये श्रेयस तळपदे साकारतोय अटल बिहारी वाजपेयींची भूमिका
नकारात्मक पात्राची प्रेक्षकांनी घेतलेली दखल, नोंद आणि त्यामागची मेहनत हे सगळं खूप सुखावणारं असल्याचं अभिज्ञा सांगते. इतर व्यक्तिरेखांपैकी मी साकारलेली भूमिका लक्षात राहणं किंवा आजही त्याची आठवण काढली जाणं ही समाधानकारक गोष्ट आहे, असं ती सांगते.
शाहरुख- कतरिनाचे सिनेमे