पाटणा : पाटण्यात बुधवारी एकाच कुटुंबातील चार जणांचा गंगेत बुडून मृत्यू झाला आहे. पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह श्राद्ध करण्यासाठी गेले असता ही दुर्देवी घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुडणाऱ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ३-४ तरुणांनीही गंगेत उड्या घेतल्या. मात्र, प्रवाह इतका जोरदार होता की त्यांना वाचवता आलं नाही. हे कुटुंब मदतीसाठी ओरडत राहिलं पण नंतर अचानक त्यांचा आवाज बंद झाला.

PHOTOS –

ही कुटूंब पाटणाच्या शेखपूरा इथं राहणारं आहे. मुकेश कुमार (४८), आभा देवी (३२), सपना कुमारी (१५) आणि चंदन कुमार (१३) अशी मृतांची नावं आहेत. अधिक माहितीनुसार, आतापर्यंत या चौघांपैकी कोणाचाही मृतदेह हाती लागला नसून स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस नदीपात्रात शोध घेत आहेत.

बारह पोलीस स्टेशनचे प्रभारी राजनंदन यांनी सांगितले की, सध्या गंगा नदीत पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे मृतदेह शोधणं कठीण झालं आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहावं, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here