मुंबई: तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीच्या (Telugu Film Industry) चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. कारण तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील निर्मात्यांच्या संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २६ जुलै रोजी त्यांनी अशी घोषणा केली आहे की १ ऑगस्टपासून सिनेमांचे शूटिंग होणार नाही आहे. शूटिंग तोपर्यंत बंद असणार आहे जोपर्यंत फिल्म इंडस्ट्रीतील समस्यांचं निरसन होत नाही. मीडिया रिपोर्टनुसार तेलुगू फिल्म इंडस्ट्री री-स्ट्रक्चर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याकरता या निर्मात्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तेलुगू सिनेमामध्ये होणारं खराब प्रदर्शन याविषयी चर्चा झाल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार निर्माते, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्यातील चर्चा कोणत्याही सामंजस्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली नाही. टॉलिवूड निर्मात्यांनी तेलगू चित्रपट उद्योगातील कलाकार आणि संबंधित क्रू यांच्याशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी १ ऑगस्टपासून शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे एक प्रसिद्धी पत्रकदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

हे वाचा-रणवीरचा न्यूड फोटो सोडा ‘त्या’ कार्पेटची किंमत पाहा; या पैशात होतील दुबईच्या ४ फेऱ्या

काय आहे निर्मात्यांचं म्हणणं?

या प्रसिद्ध पत्रकात असे म्हटले आहे की, ‘पँडेमिकनंतरच्या बदलत्या कमाईच्या परिस्थितीमुळे आणि वाढत्या खर्चामुळे चित्रपट निर्मात्यांचा एक समुजाय म्हणून ज्या समस्यांना आपण तोंड देतोय, त्यावर चर्चा करणे निर्मात्यांसाठी महत्त्वाचे आहे. आपली इकोसिस्टम चांगली करणे आणि निरोगी वातावरणातच चित्रपट प्रदर्शित करत आहोत याची खात्री करणे हीदेखील आमची जबाबदारी आहे. यामुळे जोपर्यंत आम्हाला व्यवहार्य ठराव मिळत नाही तोवर गिल्डच्या सर्व निर्मात्या सदस्यांनी १ ऑगस्ट २०२२ पासून शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.’

Telugu Film Producer Guild Press Note

कोणत्या सिनेमांचं थांबणार शूटिंग– प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’
– अखिल अक्किनेनीचा ‘एजंट’
– सामंथा रुथ प्रभूचा ‘यशोदा’
– बॉबी-चिरंजीवीचा सिनेा
– विजय आणि वामशी पैडिपल्ली यांचा सिनेमा
– चिरंजीवीचा ‘गॉडफादर’

हे वाचा-असं काय घडलं की अचानक भारत सोडून अमेरिकेत पोहोचला सनी देओल?

– अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रूल’
– चिरंजीवी- मेहेर रमेश यांचा सिनेमा
– पवन कल्याणचा ‘हरी हरा वीरा मल्लू’
– पवन कल्याणचा ‘Bhavadeeyudu Bhagat Singh’
– महेश बाबू-त्रिविक्रम श्रीनिवास यांचा सिनेमा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here