मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी-विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ३ महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. राज्य सरकारने राजकीय आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना देताना अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश करण्यात आला आहे तसेच शेतकऱ्यांसाठी वीज दरात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील शासनाने घेतला आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना वाढीव मेडिकल जागा देऊन सरकारने दिलासा दिला आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना- अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश

राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि ६ हजार कोटी निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १६.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. ५७२२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ २०१९ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुध्दा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल.

माझी निष्ठा, माझे उद्धवसाहेब! ठाकरेंच्या वाढदिवशी प्रेमाचा सागर, मुस्लिम शिवसैनिकाचे रक्ताने पत्र

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च २०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अडचणी येतात, ते दूर करण्यासाठी समितीकडून कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

जमाना हमसें है-हम जमाने सें नहीं, ज्येष्ठ शिवसैनिकाची शेरोशायरी, उद्धव ठाकरेही भारावले
३ नवीन समाजकार्य महाविद्यालयांना मान्यता

राज्यात ३ नवीन समाजकार्य महाविद्यालयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील साक्री येथील संत तुकाराम सामाजिक संस्था, उस्मानाबाद जिल्ह्यातील अश्वमेध बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, जालना येथील दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या तीन संस्थांना कायम स्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here