मुंबई : सध्या अभिनेता रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे भलताच चर्चेत आला आहे. पेपर मॅगझिनसाठी त्यानं न्यूड फोटोशूट करून धक्काच दिला. अर्थात, हे काही पहिल्यांदाच नाही झालं. हाॅलिवूडपासून बाॅलिवूडपर्यंत अशा प्रकारचे शूट्स पाहायला मिळाले. खरं तर हाॅलिवूडसाठी हे नवं नाही. नुकतंच जर्मन आणि अमेरिकन माॅडेल हेइडी क्लम हिनं न्यूड फोटोशूट करून गहजब केला आहे. ४९ वर्षाच्या हेइडी क्लमनं इन्स्टाग्रामवर न्यूड फोटोज शेअर केले आहेत.

दे धक्का २ : महेश मांजरेकरांनी पोस्टरवर उलगडली पत्नी मेधाची व्यक्तिरेखा!

मंगळवारी Heidi Klum नं न्यूड फोटो शेअर केले आहेत. तिनं पलंगावर कपड्यांशिवाय पोज दिली आहे. माॅडेलनं इन्स्टाग्रामवर कमेंट बाॅक्सला प्रायव्हेट केलंय. त्यामुळे नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया दिसत नाहीत. पण फॅन्सनं हेइडी क्लम हॅशटॅगवर रिअॅक्ट केलं आहे.

हेइडी क्लम

कोण आहे हेइडी क्लम?
हेइडी क्लम (Heidi Klum Photoshoot) जगभरात लोकप्रिय आहे. ती टेलिव्हिजन होस्ट, प्रोड्युसर आणि बिझनेस वुमन आहे. तिनं तिच्या करियरची सुरुवात माॅडेलिंगनं केली. त्यानंतर Sports Illustrated Swimsuit साठी फोटोशूट करून सनसनाटी निर्माण केली होती.

हेइडी क्लम

हेइडी मूळची जर्मनीची
हेइडीचा जन्म पश्चिम जर्मनीत Cologne मध्ये झाला. तिचे आईवडील सौंदर्यप्रसाधनांची कंपनी चालवायचे. एका फ्रेंडच्या सांगण्यावरून तिनं माॅडेलिंग सुरू केलं. तिनं माॅडेल ९२ मध्ये भाग घेतला. तेव्हा २५००० स्पर्धक माॅडेल्सना हरवून तिनं विजयाचा मुकुट घातला. त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. तिच्या माॅडेलिंग प्रवासाची सुरुवात झाली.


माॅडेलिंग विश्वात हेइडीचं खूप नाव आहे. व्होग, हार्पर बाजार यांसारख्या मॅगझिनसाठी तिनं फोटोशूट केलंय. तिनं ४ वर्ष व्हिक्टोरिया सीक्रेट फॅशन शो होस्ट केला आहे.

तो टीशर्ट पाहून सुशांतचे चाहते भडकले, Flipkartला बायकॉट करण्याची मागणी

शाहरुख- कतरिनाचे सिनेमे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here