बीड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी अवैध गर्भपात करताना एका विवहितेला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा एका विवाहितेचा बळजबरीने अवैध गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे या दोन्ही प्रकरणाची एसआयटी किंवा सीआयडीमार्फत चौकशी करावी. या मागणीसाठी बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

अवैध गर्भपाताची सीआयडी मार्फत चौकशी करा

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदान बेटी बचाओ आंदोलन करत अवैध गर्भपाताची सीआयडी मार्फत चौकशी करा तसेच दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. कालच जिल्ह्यातील परळी शहरात गर्भपाताची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

माझी निष्ठा, माझे उद्धवसाहेब! ठाकरेंच्या वाढदिवशी प्रेमाचा सागर, मुस्लिम शिवसैनिकाचे रक्ताने पत्र
दरम्यान, काल मंगळवारी परळी शहरात दुसरी मुलगीच आहे म्हणून एका विवाहितेचा गर्भ अक्षरशः कापून काढण्याचा धक्कादायक प्रकार याठिकाणी घडला आहे. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने महाराष्ट्र हादरला होता. गेल्या तीन चार वर्षात हे प्रकार कमी झाल्याचे दिसत असतानाच मागील दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील अवैध गर्भपात अन गर्भलिंग निदानचे प्रकरण समोर आले. यातील आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, यापेक्षा भयानक अन् माणुसकीला काळिमा फासणारी घटना ही परळी शहरात घडली आहे. शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सरस्वती नारायण वाघमोडे या विवाहितेला मागील वर्षी एक मुलगी झाली. त्यानंतर ती पुन्हा गर्भवती राहिली. यावेळी नवरा नारायण, सासू छाया वाघमोडे या दोघांनी गर्भलिंग निदान करण्याचा आग्रह केला.

सरस्वतीने याला विरोध केला तरीदेखील नवरा व सासूने डॉ. स्वामी यांना घरी बोलावून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले. यावेळी मुलीचा गर्भ असल्याचे कळल्यानंतर अवैध गर्भपाताचे इंजेक्शन त्या महिलेला बळजबरीने देण्यात आले. सरस्वतीला एक दीड तासाने त्रास होऊ लागल्यावर तिने ही घटना पुण्याला राहणाऱ्या भावाला कळवली. दरम्यान, डॉ. स्वामी यांनी अन्य एका सहकाऱ्याच्या मदतीने अक्षरशः सरस्वतीच्या पोटातील गर्भ कापून काढत गर्भपात केला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर भावासोबत माहेरी गेलेल्या सरस्वतीने पोलिसात फिर्याद दिली असून नवरा, सासू आणि डॉ. स्वामी आणि अन्य एक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, खंजीर खुपसला’; रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here