मुंबई: लहान मुलांना सावरकर समजलेत पण दिल्लीतल्या त्या घोड्याला सावरकर कळाले नाहीत, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली होती. या टीकेनंतर ते चर्चेत देखील आले होते. सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर टीका झाली होती. आता या प्रकरणात सामाजिक विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी उडी घेतली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पोंक्षे यांनी राहुल गांधींवर टीका कोली होती. राज्यात फक्त एकच गोळवलकर विद्यालय का आहे, असा सवाल करत त्यांनी प्रत्येक गाववात असे विद्यालय हवेत असे म्हटले होते. या शाळेतील शिक्षकांना नमस्कार करायचा आहे, असे शिक्षक प्रत्येक शाळेत हवेत. त्याच बरोबर सावरकर कार्यक्रम व्हायला हवेत. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली होती.
वाचा- १४ वर्षाच्या मुलासोबत केला जबरदस्ती सेक्स; नंतर ४५ वर्षीय महिलेनं पाहा काय केलं
काय म्हणाले विश्वंभर चौधरी
दहशतवाद विरूद्ध संविधान…
पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर… कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो.
तुम्ही मोदी शहांचे दिल्लीचे पोलीस आणि फडणवीसांचे मुंबईचे पोलीस घेऊन या. मला भीती वाटत नाही, एकटा चालत चालत येतो.
आहे का तयारी?
वाचा- धक्कादायक! अंगणवाडीच्या पोषण आहारात निघाल्या अळ्या आणि किडे; बालकांच्या जीवाशी खेळ
Like this:
Like Loading...