Ganesh Festival 2022, गणेशमूर्तिकार मोठ्या चिंतेत! राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी – ganesha artisans are demanding that the state government should lift gst on plaster of paris
धुळे : राज्य सरकारने धार्मिक उत्सवांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या एक महिन्यात मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती (Ganesh Idols) तयार करणे मूर्तिकारांना (Ganesha Artisans) अशक्य आहे. यामुळे यंदाच्या गणेश उत्सवात (Ganesh Festival 2022) मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचा तुटवडा जाणवणार आहे. तसेच राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिस वरील जीएसटी उठवावा, अशी देखील मागणी मूर्तिकारांकडून करण्यात येत आहे. (ganesha artisans are demanding that the state government should lift gst on plaster of paris)
यंदाचा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव कोणत्याही निर्बंधांशिवाय पार पडणार असून याबाबतचे आदेश राज्य सरकारने नुकतेच पारित केले आहेत. महाविकास आघाडीने कोरोना आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काही निर्णय घेतले होते यात मोठ्या आकाराच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली होती. तसेच चार फुटापर्यंतच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हा निर्णय रद्द करून निर्बंध हटवले आहेत. यंदाचा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंध मुक्त साजरा होणार आहे. शेतकऱ्याला शेतात आढळली १३ अंडी; १५ दिवस उबवल्यानंतर बाहेर आली… मात्र, अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती इतक्या कमी कालावधीत करणे अशक्य असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या आकाराच्या मूर्ती उपलब्ध होणे अशक्य आहे. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि रंगावरील जीएसटी यामुळे मूर्तिकारांना मोठा फटका बसला आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे देखील मूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता मूर्तिकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
MIM नगरसेविकेच्या भावाला भरचौकात मारहाण; बेसबॉल बॅटने मारल्याने रक्तबंबाळ त्यामुळे राज्य सरकारला शक्य असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिस आणि अन्य इतर वस्तूंवरील जीएसटी कर माफ करून यंदाचा उत्सव आनंदात पार पाडावा अशी मागणी मूर्तिकार आता करीत आहे .त्यामुळे राज्य सरकार आता काय निर्णय घेतात हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.