मुंबई : खरी शिवसेना कोणाची, हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामधील वादावर उत्तर न्यायालात मिळणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कोणाला मिळेल याचेही उत्तर अजून मिळायचे आहे. एकीकडे ही स्थिती असताना, दुसरीकडे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. तर उद्धव ठाकरे हे देखील अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या पदांवर नियु्क्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. त्यानुसार, शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे (Sanjay More) यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. (cm eknath shinde announced new appointments of shiv sena)

तर, आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, खंजीर खुपसला’; रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

‘उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्वाला मोठे होऊ द्यायचे नाही’; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here