मुंबई : किस्सा २०१४ चा आहे जेव्हा दीपक केसरकर राष्ट्रवादीत होते आणि तिथे असूनही त्यांनी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना मदत केली.. परिणाम असा झाला की मुंबईत नगरसेवक राहिलेले विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांचा दारुण पराभव झाला.. पराभव साधा नव्हता.. राऊतांनी दीड लाख मतांच्या फरकाने राणेंवर मात केली.. ही मात करण्यासाठी केसरकरांसारखंच उदय सामंतांनीही हात लावला आणि त्यांच्या रत्नागिरी मतदारसंघात सर्वात जास्त लीड दिली.. विनायक राऊतांना पहिल्यांदा खासदार होण्यासाठी मदत करणारे उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोघेही सध्या शिंदे गटात गेलेत.. राऊत हे ठाकरेंसोबत कायम एकनिष्ठ राहिलेत.. पण २०२४ ला शिंदेंसोबत गेलेले केसरकर आणि उदय सामंत हेच विनायक राऊतांची सर्वात मोठी धास्ती आहेत.. ठाकरेंसाठी मतदारसंघातल्या सहकाऱ्यांनाच अंगावर घेणाऱ्या विनायक राऊतांची स्टोरी वाचा…

उद्धव ठाकरेंसोबत सध्या जे दोन राऊत आहेत, त्यात एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे विनायक राऊत.. संजय राऊतांविषयी तुम्हाला माहिती आहेच.. विनायक राऊत हे सुद्धा बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत.. १९८५ ला ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले, पुढे शिवसेनेने त्यांना प्रमोशन द्यायचं ठरवलं.. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत ते मुंबईतल्याच विले पार्ले मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले.. यानंतर शिवसेनेत त्यांचं प्रस्थ वाढतच गेलं आणि शिवसेनेने त्यांना २०१२ ला विधानपरिषदेवरही नियुक्त केलं.. पुढे नारायण राणे यांना आव्हान देण्याची वेळ आली तेव्हा हेच विनायक राऊत पुढे आले.. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या मुलाला हरवण्यासाठी विनायक राऊतांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ गाठला… ते निवडणूक लढले.. एकदा नव्हे, सलग दोनदा खासदार झाले.. दोन्हीही वेळा त्यांनी राणेंवर मात केली.

पर्याय शोधले, तयारीला लागले, उद्धव ठाकरेंचे ३ एक्के, ज्यामुळे बंडखोरांना निवडून यायचं मुश्किल!
विनायक राऊत हे खासदार कसे झाले त्याची स्टोरीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे.. २००९ ला निलेश राणेंनी शिवसेनेच्या सुरेश प्रभूंना हरवत विजय मिळवला होता.. राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष अत्यंत टोकाचा आहे आणि यात राणेंवर मात करायची तर २०१४ च्या निवडणुकीत मागच्या पराभवाचा वचपा काढणं ठाकरेंसाठी गरजेचं होतं.. कारण, २०१४ ची लोकसभा ही बाळासाहेबांच्या निधनानंतरची उद्धव ठाकरेंसमोरची पहिली निवडणूक होती.. यासाठीच बालेकिल्ला असलेल्या कोकणासाठी ठाकरेंनी मुंबईत आमदार असलेल्या विनायक राऊतांची निवड केली. २०१४ च्या लोकसभेसाठी विनायक राऊतांचं तिकीट कंफर्म झालं आणि त्यांनी कोकणात मोर्चेबांधणी सुरू केली..

३ मुलात सर्वात लाडके, जवळचे सोडून गेले, पण उद्धव ठाकरेंच्या पाठिशी बाळासाहेब कायम राहिले
रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला हा मतदारसंघ आहे. विनायक राऊतांना मोर्चेबांधणी करताना सर्वात मोठा आधार मिळाला तो राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा.. दीपक केसरकर तेव्हा राष्ट्रवादीत होते.. राणेंसोबत त्यांचे खटके उडत होते आणि राणेंना पाडण्यासाठी केसरकरांनी शिवसेनेला मदत करायचं ठरवलं.. एकट्या केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात राऊतांना ४१ हजारांचं लीड मिळालं.. उदय सामंतही मदत करण्यात मागे नव्हते.. विनायक राऊतांना जवळपास पाच लाख मतं मिळाली होती आणि एकट्या रत्नागिरीत जवळपास एक लाख मतं उदय सामंतांनी मिळवून दिली.. सध्याच्या घडीला उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोघेही ठाकरेंसोबत नाहीत.. राऊतांनी तर या दोघांवर जाहीर टीका केलीय..

जमाना हमसें है-हम जमाने सें नहीं, ज्येष्ठ शिवसैनिकाची शेरोशायरी, उद्धव ठाकरेही भारावले
विनायक राऊत २०१४ नंतर पुन्हा २०१९ मध्येही खासदार झाले.. त्यांनी २०१९ लाही निलेश राणेंचाच पराभव केला. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर प्रत्येक खासदार आणि आमदार स्वतःच्या २०२४ ची गणितं जुळवतोय, या गणितांनुसारच काही जण शिंदेंकडे गेलेत, तर काही जण ठाकरेंसोबतच राहिले.. पण विनायक राऊत हे गणितांचा विचार न करता ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहणारे नेते म्हणून ओळखले जातात.. तरीही विनायक राऊत जर २०२४ ला लढले तर त्यांचा मार्ग सोपा नसेल.. कारण, आव्हान आहे ते सध्या भाजपात असलेल्या राणे कुटुंबाचं.. त्यात केसरकर आणि उदय सामंत यांचीही साथ नसेल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here