मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांवर टीकास्त्र सोडायला सुरू केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वेगवेगळे आरोपही करत आहेत. त्यानंतर रामदास कदम सतत चर्चेत आहेत. आज रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्यांच्या मुंबईतील कांदिवली येथील पालखी या निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या आणि रामदास कदम सारखा आक्रमक नेता पक्षासाठी आवश्यक असल्याचे सूचित केले. (cm eknath shinde met ramdas kadam at his residence palkhi)

राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत त्यांनी रामदास कदम यांची शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आज झालेल्या या सदिच्छा भेटीला एक विशेष महत्व झाले आहे.

ठाकरेंना धक्का; मुख्यमंत्री शिंदेंकडून सेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर; पावसकर, मोरे सचिवपदी
शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर डौलाने फडकत असतानाच रामदास कदम नावाची मुलुखमैदान तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशात सुरू करावी याच शुभेच्छा त्यांनी यावेळी कदम यांना दिल्या.

‘उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्वाला मोठे होऊ द्यायचे नाही’; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
यावेळी रामदास कदम यांचे दोन्ही सुपुत्र आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, खंजीर खुपसला’; रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here