नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया आणि त्यांच्या कुटुंबासाठी कालचा दिवस विशेष ठरला. फिरोजिया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी सहकुटुंब गेले होते. त्यावेळी फिरोजिया यांच्यासोबत त्यांची ५ वर्षांची मुलगी आहनादेखील होती. आहना पहिल्यांदाच मोदींना भेटली. मोदी आणि आहना यांच्यात थोडा संवादही झाला. मोदींनी आहनाला काही प्रश्न विचारले. तिनंही बालसुलभ उत्तरं दिली. तिची उत्तरं ऐकून मोदींसह तिथे उपस्थित असलेले सारेच खळखळून हसले.

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे खासदार नवी दिल्लीत आहे. भाजपचे मध्य प्रदेशातील खासदार अनिल फिरोजिया सहकुटुंब पंतप्रधान मोदींना भेटायला गेले. त्यावेळी फिरोजिया यांची ५ वर्षांची मुलगी आहना त्यांच्यासोबत होती. मी कोण आहे, तुला माहित्येय का? असा प्रश्न मोदींनी आहनाला विचारला. त्यावर तुम्ही मोदीजी आहात. मी तुम्हाला टीव्हीवर पाहिलंय. तुम्ही लोकसभा टीव्हीवर काम करता. आहनाचं उत्तर ऐकून एकच हशा पिकला. मोदींनाही हसू आवरता आलं नाही. मोदींनी आहनाला चॉकलेट्स दिली. त्यामुळे आहनाचा चेहरा खुलला होता.
‘सर तन से जुदा…’; वडिलांना मेसेज आला अन् B.Techच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रुळांवर सापडला
उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया काही महिन्यांपूर्वीच चर्चेत आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी फिरोजिया यांना वजन कमी करण्याचं आव्हान दिलं होतं. तुम्ही जितकं वजन कमी कराल, तितके हजार कोटी रुपये मी तुमच्या लोकसभा मतदारसंघातील विकासकामांवर खर्च करेन, असा शब्दच गडकरींनी दिला होता. त्यानंतर अनिल फिरोजिया यांनी १६ किलो वजन कमी केलं. आता गडकरींच्या खात्याकडून १६ हजार कोटी रुपये मिळतील अशी आशा फिरोजिया यांना आहे.
कपडे फाटलेले, रक्ताचा एक थेंबही नाही; १४व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू, हत्येचा संशय
पाच महिन्यांपूर्वी नितीन गडकरी उज्जैनला आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक खासदार फिरोजिया यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला. गडकरींनी दिलेलं आव्हान फिरोजिया यांनी स्वीकारलं. तीन महिन्यांत त्यांनी १६ किलो वजन कमी केलं. पाच महिन्यांपूर्वी फिरोजिया यांचं वजन १३० किलो होतं. पुढच्या तीन महिन्यांत त्यांनी ते ११४ किलोवर आणलं. लवकरच वजन १०० किलोच्या खाली आणू आणि गडकरींना भेटू, असा निश्चय आता फिरोजिया यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here