Cash worth Rs 20 crore, gold bars found in another house owned by Arpita Mukherjee: पश्चिम बंगालच्या शिक्षण घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. बुधवारी दुपारपासून सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी)पथकानं मुखर्जीच्या दुसऱ्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घरात पैशांचं मोठं घबाड सापडल्याचं वृत्त आहे.

 

arpita
अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडलं घबाड
कोलकाता: पश्चिम बंगालच्या शिक्षण घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. बुधवारी दुपारपासून सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी)पथकानं मुखर्जीच्या दुसऱ्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घरात पैशांचं मोठं घबाड सापडल्याचं वृत्त आहे. मुखर्जीच्या घरात ईडीच्या अधिकाऱ्यांना इतक्या प्रचंड प्रमाणात नोटा सापडल्या की त्या मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन मागवाव्या लागल्या. आतापर्यंत ईडीनं २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय ३ किलो सोनंदेखील ताब्यात घेण्यात आलं आहे. पैसे घेऊन जाण्यासाठी ईडीनं २० ट्रक मागवले आहेत.

ईडीनं बुधवारी अर्पिताच्या क्लब टाऊनमधील अपार्टमेंटवर छापा टाकला. या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात रोकड लपवल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. अपार्टमेंटमध्ये ईडीला घबाड सापडलं. अधिकाऱ्यांच्या हाती नोटांचा अक्षरश: ढिग लागला. आतापर्यंत या प्रकरणात ईडीनं ४५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. परदेशी चलनही जप्त करण्यात आलं आहे. मागील धाडीदरम्यान अर्पिताच्या घरात २० पेक्षा अधिक फोन आणि अनेक कंपन्यांची कागदपत्रं सापडली होती.
मला ओळखतेस का? मोदींचा चिमुरडीला सवाल; उत्तर ऐकून पंतप्रधान खो-खो हसले
शिक्षण घोटाळा प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री असलेल्या पार्थ चॅटर्जी यांना अटक झाली आहे. त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली आहे. अर्पिताच्या घरात सापडलेल्या काळ्या रंगाच्या डायरीबद्दल त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. ही डायरी बंगाल सरकारच्या उच्च शिक्षण विभागातील असल्याचं समजतं. या डायरीतील ४० पानांवर बराच मजकूर आहे. या डायरीमुळे एसएससी घोटाळ्यातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
‘ईडी’ला अटकेचे आणि जप्तीचे अधिकार; याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
पार्थ चॅटर्जी यांच्या घरात क आणि ड गटातील भरतीशी संबंधित उमेदवारांचे दस्तावेज मिळाले आहेत. ड गटातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये पार्थ चॅटर्जींचा सक्रीय सहभाग होता ही बाब पुराव्यांमुळे सिद्ध झाली आहे. त्यामुळे चॅटर्जी गोत्यात आले आहेत. मात्र त्यांच्याकडून ईडीला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचं कळतं. मला माहीत नाही, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी बऱ्याचशा प्रश्नांना दिलं आहे. अर्पिता मुखर्जीच्या घरातून सातत्यानं रोख रक्कम जप्त होत आहे. त्यामुळे तिच्याही अडचणी वाढल्या आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here