बुलडाणा : बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला, मात्र जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचं दिसत आहे. कारण प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे. खासदाराच्या कुटुंबातच भूकंप झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हादरे बसले आहेत.

संजय जाधव हे प्रतापराव जाधव यांचे सख्खे धाकटे भाऊ. ते उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) शिवसेनेत असल्याने भावाभावांतील मतभिन्नतेविषयी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रातून छापून आलेल्या जाहिरातीतही संजय जाधव यांनी ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असाच करण्यात आला आहे. शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर नेत्यांसोबत त्यांचे फोटो दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत असून उद्धव साहेब हे माझे नेते असल्याचेही संजय जाधवांनी सांगितले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुलडाणा जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने हकालपट्टी केली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीहून पुनश्च प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व पदांच्या नेमणुकीचे अधिकारही दिले.

हेही वाचा : आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ शिवसेनेत प्रवेश करणार, ठाकरेंच्या संकटात बहीण साथीला!

शिवसेनेच्या १२ खासदारांनी १९ जुलैला गट तयार करून एक पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. या खासदारांमध्ये प्रतापराव जाधवांचा समावेश होता.

Prataprao Jadhav

प्रतापराव जाधव

हेही वाचा : “आंबे कापून खाता की चोखून खाता? किमान असे प्रश्न तरी ठाकरेंना विचारले नाहीत”

त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक होऊन दाखवावं, अशा शब्दात जाधवांनी राऊतांना डिवचलं होतं. आम्ही १५ ते २० लाख लोकांमधून निवडून येतो. त्यांना आम्ही बांधिल आहोत. त्यांची कामं झाली नाहीत तर आम्हाला त्यांना उत्तरं द्यावी लागतात. संजय राऊत सतत टीका करत असतात. त्यांनी एकदा निवडून येऊन दाखवावं. लवकरच मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक आहे. राऊत यांनी कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवावी आणि नगरसेवक होऊन दाखवावं, असं आव्हान प्रतापराव जाधव यांनी दिलं होतं.

हेही वाचा : कॅबिनेट विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, दिल्लीवारीपूर्वी शिंदेंनीच सांगितली डेडलाईन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here