मुंबई: डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला कॉल करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पैसे न दिल्यास तुमचे खासगी फोटो व्हायरल करू, अशी धमकी दाम्पत्याला मिळाली होती. त्यानंतर दाम्पत्यानं खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून गुन्हेगाराचा शोध घेतला जात आहे.
अझिझनं डॉक्टर दाम्पत्याला फोन करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुमचे फोटो व्हायरल करू, अशी धमकी अझिझनं दिली. अझिझचा शोध घेण्यासाठी खार पोलिसांनी पथक तयार केलं आहे. आरोपीचा हेतू नेमका काय आहे, ते त्याच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल, असं खार पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यानं सांगितलं.