दिशाने याआधीही मुलाखतीत बरेच काही सांगितले
टायगरने नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्यावर मौन पाळले असताना, दिशा अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्या नात्याबद्दल प्रत्येक्ष- अप्रत्यक्षरित्या बोलली आहे. २०१९ मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही ती बरंच बोलली ज्याचा संदर्भ आता लागत आहे.

‘मुलांकडून मला असं कोणतंही अटेंशन मिळालं नाही’
दिशाला टायगरसोबतच्या बॉण्डिंगबद्दल आणि नात्याबद्दल विचारले असता, अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही दोघेही फिटनेसबाबत अधिक जागरुक आहोत. पण टायगर फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करतो.’ पुरुषांमध्ये तिची फॅन फॉलोअर्स मोठी असली तरी, दिशाने सांगितले की तिला कोणत्याची पुरुषाकडून आतापर्यंत अटेंशनन मिळालेलं नाही. ती म्हणाली की, ‘हे सामान्य आहे की नाही माहीत नाही, परंतु मला कधीही डेटसाठी कोणीही विचारले नाही किंवा प्रपोज केलं नाही. मी खोटं बोलत नाही. मला मुलांकडून असं कोणत्याही प्रकारचं अटेंशनच कधी मिळालं नाही.’

दिशा म्हणाली- मी त्याला इम्प्रेस करण्याचे प्रत्येक प्रयत्न केले
टायगरनेही तुला कधी अटेंशन दिलं नाही का? असा प्रश्न विचारला असता दिशा म्हणाली, ‘मी खूप दिवसांपासून टायगरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला माझ्यात रस नाही असंच दिसतं. आम्ही जेवायला, फिरायला जातो, पण मला मैत्रीपेक्षा जास्त हवंय, मात्र तसं होत नाहीये. आम्ही यापेक्षा जास्त जवळ असावं असं मला वाटतं, परंतु हे एकतर्फी प्रेम आहे. मी त्याला इम्प्रेस करण्याचे सगळे प्रयत्न केले. जिम्नॅस्टिक्स, फिटनेस आणि बरेच काही त्याच्यासाठी, पण काही उपयोग झाला नाही.’ सुरुवातीला दिशा खोटं बोलत असल्याचं आणि तिच्या खासगी गोष्टी लपवून ठेवण्यासाठी मीडियाची दिशाभूल करत असल्याचं बोलत असेल असं वाटतं होतं, पण आता ती खरं बोलत होती हे कळून आलं.

शेवटी तिने नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला
या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने बॉम्बे टाइम्सला सांगितले की, ‘दोघांची खूप दिवसांपासून मैत्री आहे. टायगरला स्वत:च्या आयुष्याबद्दल आणि फिटनेसबद्दल काय करायचं आहे या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यात स्पष्ट आहेत. याबाबत तो पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होत्या. मात्र दिशाला आशा होती की काळासोबत परिस्थिती बदलेलं आणि तोही दिशाच्या प्रेमात पडेल, पण तसं झालं नाही. एकतर्फी संबंध भावनिकदृष्ट्या संपुष्टात आले आणि त्यातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. काही काळ त्रास झाला आणि शेवटी त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.’
लोकसंख्या नियंत्रणासाठी पूनम पांडेनं सांगितला भलताच उपाय