Police officer Vikas Bhujbal Death : बुधवारी दुपारी राजभवन परिसरातील कार्यालयात असतानाच पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले. इतर अधिकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे रुग्णालयात नेले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आपण एका संवेदनशील पोलिस अधिकाऱ्याला मुकलो आहोत,’ या शब्दांत राज्यपालांनी शोक व्यक्त केला.

राजभवनातच छातीत कळ, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचं निधन
हायलाइट्स:
- राजभवनातच छातीत कळ,
- कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचं निधन,
- राज्यपालही हळहळले
‘विकास भुजबळ कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व मनमिळावू अधिकारी होते. हसतमुख असलेले भुजबळ यांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपण एका संवेदनशील पोलिस अधिकाऱ्याला मुकलो आहोत,’ या शब्दांत राज्यपालांनी शोक व्यक्त केला.
बुधवारी दुपारी राजभवन परिसरातील कार्यालयात असतानाच भुजबळ यांना छातीत दुखू लागले. इतर अधिकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे रुग्णालयात नेले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network