भोपाळ: मध्य प्रदेशच्या रायसेनमधील रेल्वे रुळांवर बीटेकचा विद्यार्थी निशांक राठौरचा मृतदेह आढळून आला. निशांक राठौरचा मृतदेह आढळून येण्यापूर्वी त्याच्या वडिलांना एक मेसेज आला होता. त्यात ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा’, असा मजकूर होता. निशांकच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

निशांक राठौर क्रिप्टो करन्सी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा. त्यात त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये निशांकच्या मृत्यूचा तपास सुरू आहे. ही हत्या आहे की आत्महत्या ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. निशांकनं शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली होती, अशी माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली.
‘सर तन से जुदा…’; वडिलांना मेसेज आला अन् B.Techच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रुळांवर सापडला
निशांकनं केलेल्या गुंतवणुकीत त्याला बराच तोटा सहन करावा लागला. त्याची भरपाई करण्यासाठी आणि शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करण्यासाठी निशांकनं काही मित्रांकडून उधारी घेतली होती. निशांकनं मित्रांचे पैसे परत केले नव्हते. त्यामुळे त्याचा मित्रांशी संवादही होत नव्हता, अशी माहिती सुत्रांनी दिली. निशांकला शेअर बाजार आणि क्रिप्टोमध्ये बराच रस होता. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टवरूनही ही गोष्ट दिसून येते. १६ जून २०२२ रोजी त्यानं क्रिप्टो करन्सीबद्दलची एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती.
कपडे फाटलेले, रक्ताचा एक थेंबही नाही; १४व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू, हत्येचा संशय
याआधी निशांकच्या मृत्यूचा संबंध एका व्हॉट्स ऍपशी जोडण्यात आला. हा मेसेजदेखील निशांकच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ‘गुस्ताब-ए-नबी की एक ही सजा, सिर तन जे जुदा,’ असा मजकूर मेसेजमध्ये होता. आपल्याला व्हॉट्स ऍपवर एक मेसेज आला होता, अशी माहिती निशांकचे वडील उमाशंकर यांनी दिली. ‘राठौर साहेब, तुमचा मुलगा खूप शूर होता. सगळ्या हिंदूंना सांगा, नबीबद्दलच्या चुकीला माफी नाही,’ असा मजकूर मेसेजमध्ये होता, अशी माहिती उमाशंकर यांनी सांगितली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here