भारतातही मंकीपॉक्सचा शिरकाव (Monkeypox Cases In India)
करोनानंतर आता भारतातही मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे. देशात आतापर्यंत ५ लोकांना मंकीपॉक्स झाला आहे. यामध्ये ३ केरळमधून आणि एक प्रकरण दिल्लीतलं आहे. चिंतेची बाब ही की नोएडा आणि गाजियाबादमध्येही मंकीपॉक्सचे ३ रुग्ण समोर आले आहेत. सध्या त्यांच्या नमुण्यांची चाचणी सुरू आहे. अधिक माहितीनुसार, झारखंडमध्येही मंकीपॉक्सचा रुग्ण समोर आला आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना (Monkeypox Guidelines India)
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा गंभीर रोग जनावरांपासून माणसात पसरला आहे. मंकीपॉक्स फक्त काही प्रकरणांमध्येच प्राणघातक ठरून शकतो. मात्र, यामुळे याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते. मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला २१ दिवस वेगळं राहणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे मंकीपॉक्सचा उष्मायन काळ २१ दिवसांचा असतो. याशिवाय मास्क घालणे बंधनकारक आहे. सतत हात धुणे. मंकीपॉक्सने प्रभावित त्वचा पूर्णपणे झाकून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
WHO कडून मार्गदर्शक गाइडलाइन…
मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की मंकीपॉक्सपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचा संसर्ग टाळणे. मंकीपॉक्स टाळण्यासाठी, दोन पुरुषांमधील लैंगिक संबंधांबद्दल सर्वात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, असे डब्ल्यूएचओचे मत आहे.
दोन पुरुषांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्यामुळे चिंता वाढली…
डब्ल्यूएचओच्या मते, अशा लोकांनी त्यांच्या सेक्स कमी करायला हवे. नवीन लैंगिक संबंध बनवण्यापासून सावध राहा. याबाबत लाज आणि भेदभावाची भावना या आजाराचा संसर्ग आणखी वाढवू शकते, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. WHO च्या मते, मंकीपॉक्सची ९८% प्रकरणं पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये आहेत. परंतु, मंकीपॉक्स कोणालाही होऊ शकतो, म्हणूनच WHO ने शिफारस केली आहे की जगभरातील देशांनी मुले, गर्भवती महिला आणि इतर असुरक्षित गटांमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कारवाई करावी.
मिठी मारणे, चुंबन घेणेदेखील धोकादायक…
डब्ल्यूएचओच्या मते, जवळचा संपर्क, मिठी मारणे, चुंबन घेणे, संक्रमित बेडिंग आणि टॉवेल वापरणेदेखील मंकीपॉक्सच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकते. WHO च्या मते, मंकीपॉक्स टाळण्यासाठी या सावधगिरींचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.