टीम इंडियानं सर्वप्रथम १९८३ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला. त्या मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर १९८८ आणि १९९६ मध्ये भारताचा पराभव झाला. टीम इंडियानं २००२ मध्ये विंडीजमध्ये पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकली. त्यावेळी सौरव गांगुली भारताचा कर्णधार होता. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतानं २-१ अशी जिंकली.
आतापर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये १० एकदिवसीय मालिका खेळला आहे. त्यातील ४ मालिका विंडीजनं जिंकल्या आहेत. तर ६ मालिकांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे. जून २००९ पासून भारतानं वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका गमावलेली नाही.
धवनच्या आधी रोहितचा लय भारी विक्रम
भारतानं एकदिवसीय मालिकेत केवळ दोनदाच वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला आहे. याआधी याच वर्षाच्या फेब्रुवारीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजला ३-० असं नमवलं. एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देणारा पहिला भारतीय कर्णधार होण्याचा मान त्यामुळे रोहितनं मिळवला. आता धवननं विंडीजला थेट त्यांच्याच मायभूमीत क्लीन स्वीप देण्याची किमया साधली आहे.