सातारा : मुंबईहून तुम्ही गावी प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, साताऱ्याला जात असताना एका व्यापाऱ्यासोबत भयंकर प्रकार घडला आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील माळशिरस रोडवर गाडेकर वस्तीनजिक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथील सोने चांदीचे व्यापा-याचं सुमारे २० लाखांच सोनं लुटल्याची घटना घडली आहे.

सोनं व्यापारी कुमावत अकलूज इथे त्यांच्या चारचाकी गाडीतून निघाले असताना सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी पिस्तुलाचा धाक दाखवून १५ ते २० लाखांचे सोने चोरून नेल्याची घटना घडल्याने म्हसवड परिसरातील व्यापारी वर्गात कमालीची भीती पसरली आहे. मुंबई येथील कुमावत नावाचे सोने-चांदीचे व्यापारी आपल्या चारचाकी वाहनातून अकलूज येथे त्यांच्या सोन्याच्या पेढीकडे निघाले असताना ही घटना घडली आहे.

पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, मैदानावर धावताना अचानक कोसळला अन्….
सायंकाळीच्या दरम्यान गाडेकर वस्तीनजिक दोन मोटारसायकलींवरून चौघे आले. एक मोटारसायकल कारला आडवी मारुन कुमावत यांची गाडी उभी केली व दुसऱ्या मोटारसायकलींवरील एकाने आपल्या जवळील पिस्टूलचा धाक दाखवून कुमावत यांच्या जवळील १५ ते २० लाख रुपये किमतीचे सोने व दागिने लुटून पोबारा केला. या घटनेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. माळशिरस परिसरापर्यंत चोरट्याचा तपास रात्री उशीरापर्यंत सुरू होता. या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे करत आहेत.

Monkeypox : सेक्स, मिठी ते किसिंग… मंकीपॉक्स रोखण्यासाठी गाइडलाइन्स जारी, आताच व्हा सावध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here