Bhagyashree Rasal | Lipi | Updated: Jul 28, 2022, 1:22 PM
Bigg Boss 16 Theme: सलमान खान त्याच्या प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त ठरणाऱ्या बिग बॉस कार्यक्रमामुळे कायम चर्चेत असतो. आता सलमान त्याच्या या कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे चर्चेत आला आहे. या प्रोमोत बिग बॉसच्या घर दिसत असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हायलाइट्स:
- बिग बॉस १६ च्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रोमो रिलीज होण्याची शक्यता
- प्रेक्षकांना आता बिग बॉस १६ ची प्रतिक्षा
बिग बॉस १५ मध्ये तेजस्वी प्रकाश विजेती ठरली होती. कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांचे वाद, भांडणं अनेकादा विकोपाला जातात. स्पर्धकांच्या वागण्यावरून त्यांच्यावर टीका देखील केली जाते. असं असलं तरी देखील हा कार्यक्रम मोठ्या संख्येनं पाहिला जातो. वास्तविक बिग बॉस १५ ला आधीच्या तुलनेत टीआरपी कमी मिळाला होता. मात्र निर्मात्यांना पुढच्या १६ व्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. दरम्यान बिग बॉस १६ (Bigg Boss 16) च्या चित्रीकरणाला सलमान खान यानं सुरुवात केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. इतकंच नाही तर कार्यक्रमाचा प्रोमोतील काही भाग सोशल मीडियावर लीक झाला आहे.
खरं तर सलमान सध्या किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) याच्याबरोबर त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तरी देखील त्यातून वेळ काढत सलमाननं कार्यक्रमाच्या प्रोमोचं चित्रीकरण केलं आहे. हा प्रोमो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर या प्रोमोतील काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये सलमान खान बिग बॉसच्या घरात गेलेला दिसत आहे. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यावरून यंदाच्या बिग बॉसच्या घराची थीम पाणी अशी ठेवण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बिग बॉस हाऊस (Bigg Boss House) जे फोटो व्हायरल झाले आहेत, त्यात घरातील आतील भाग निळ्या रंगानं रंगवलेला दिसत आहे. ते पाहून समुद्राच्या आतमध्ये असल्याचा भास होत आहे. इतकंच नाही तर समुद्राखालील प्राणीविश्वाचे मोठे फोटो लावले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये सलमानच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.