Sushma Andhare joins Shivsena | धुळ्याचे शकील बागवान म्हणाले की, ‘ताई हमारा पैगाम देना, हम धुलीयासे है. तमाम मुस्लीम कौम आपके साथ है. हम भाजप का दट कर सामना करेंगे’. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या विविध भागातील मुस्लीम जनसमुदायाच्या मनातील भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या हस्ते सुषमा अंधारे यांनी हातात शिवबंधन बांधून घेतले.

हायलाइट्स:
- माझ्या डोक्यावर ना ईडीच्या फाईलचं ओझं आहे
- आज जोरजोरात गळे काढून रडायचे आणि नंतर दुसऱ्या गटात सामील व्हायचे
- शिवसैनिकाच्या घरातील बहीण आणि लेक होण्याचा प्रयत्न करेन
यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात एकनाथ शिंदे गटातील बंडखोरांना टोले लगावले. माझ्या डोक्यावर ना ईडीच्या फाईलचं ओझं आहे ना माझ्यासमोर कोणतही प्रलोभन नाही. मी शिवसेनेत कोणत्याही पदासाठी प्रवेश केलेला नाही. त्याऐवजी मी राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातील बहीण आणि लेक होण्याचा प्रयत्न करेन. मला अजूनही शिवसेनेतील पीठा-मीठाचे, चहा-साखरेचे डबे माहिती नाहीत, येथील पद्धती माहिती नाहीत. त्यामुळे मला सांभाळून घ्या. निलमताई गोऱ्हे या मला आईप्रमाणे सांभाळून घेणाऱ्या आहेत. तर सचिन अहिर यांच्या रुपाने माहेरचा माणूस माझ्यासोबत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आज जोरजोरात गळे काढून रडायचे आणि नंतर दुसऱ्या गटात सामील व्हायचे, असा प्रकार माझ्याकडून घडणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
मी शिवसेनेवर पूर्वी जरूर टीका केली आहे. पण माझं जे बोलायचं होते ते बोलून झालंय, आता सर्व गोष्टी क्लिअर आहेत. कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू परवडतात. त्यामुळे मी कधीकाळी शिवसेनेवर टीका केली असेल. पण आज संविधानाच्या शत्रूंविरोधात लढण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करायला तयार आहे, असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे यांची उपनेतेपदी नियुक्ती करत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network