doctor in dhule removes kidney stone of 1 kilo: धुळे शहरातील डॉक्टर आशिष पाटील यांनी शेतकऱ्याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे.

 

kidney stone
डॉक्टरांनी काढला १ किलो वजनाचा मुतखडा
धुळे: धुळे शहरातील डॉक्टर आशिष पाटील यांनी शेतकऱ्याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. भारत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आकाराचा मुतखडा काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील पन्नास वर्षीय शेतकरी रमण चौरे यांच्या मूत्राशयातून नारळ एवढ्या आकाराचा, सुमारे एक किलो वजनाचा मुतखडा शस्त्रक्रिया करून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात धुळे शहरातील डॉक्टर आशिष पाटील यांना यश आले. त्यांच्या या शस्त्रक्रियेची दखल इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
धक्कादायक! ओव्हरटेकिंगवरून वाद; कावड यात्रेकरूंची जवानाला बेदम मारहाण; अर्ध्या तासात मृत्यू
चौरे यांच्या मूत्राशयातून काढण्यात आलेल्या मुतखड्याचा आकार १२.५ बाय १२.७५ सेंटिमीटर असून हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा मुतखडा असल्याचे डॉक्टर आशिष पाटील यांनी सांगितले आहे. सर्वात मोठा मुतखडा शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्याचा विक्रम याआधी आशिष पाटील यांच्याच नावावर होता. पाटील यांना आतापर्यंत दोन गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड, दोन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यासह २१ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मूत्ररोग चिकित्सालयातील विविध संशोधकांचे पाच पेटंट मिळविणारे डॉक्टर आशिष पाटील भारतातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here