lottery ticket in india, कर्जामुळे घर विकण्याच्या तयारीत होता, दोन तास आधी असं काही घडलं की झाला कोटीचा मालक – kerala man wins rs 1 crore lottery before selling house out of debt viral news today
केरळ : केरळमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीसोबत असं काही झालं की आता थेट कोटींचे मालक झाले आहेत. व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी आणि दोन मुलींच्या लग्नासाठी त्यांनी सुमारे ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सगळ्यात गंभीर म्हणजे बँकेकडून आणि जवळच्या व्यक्तींकडून घेतलेले कर्ज परत करण्यासाठी व्यक्तीला पैशांची नितांत गरज होती. पण यानंतर या व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कारच घडला आहे.
कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वर इथले रहिवासी असलेल्या मोहम्मद बावा हे कर्ज फेडण्यासाठी घर विकण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांना थेट एक कोटींची लॉटरी लागली. ‘मी लॉटरी जिंकली आहे, त्यामुळे आता घर विकण्याची गरज नाही’, असे बावा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भारत सरकारकडे ८ वर्षात २२ कोटी अर्ज, पण किती लोकांना मिळाल्या नोकऱ्या? आकडेवारी वाचाच…
लॉटरी विजेत्या मोहम्मद यांनी सांगितले की, व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे तो खूप चिंतेत होता, पण आता देवानेच त्यांना मार्ग दाखवला आहे. कर्जातून मार्ग काढण्याच्या आशेने, ५० वर्षीय मोहम्म यांनी रविवारी दुपारी एका विक्रेत्याकडून केरळ सरकारच्या ५०-५० लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. मोहम्मद यांना ५ मुलं आहेत. रविवारी दुपारी ३.३० पर्यंत लॉटरीचा निकाल जाहीर झाला आणि सुदैवाने त्यांना बक्षीस मिळालं.
मोहम्मद यांनी सांगितले की ते कर्जामुळे खूप तणावात होते. अशात त्यांनी मित्राकडून लॉटरीचं तिकीट घेतलं आणि त्यांना खरंच लॉटरी लागली. या पैशाचे काय करणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कर्जाची परतफेड केल्यानंतर उर्वरित रक्कम गरीब आणि गरजूंसाठी खर्च करणार आहे. मोहम्मद बावा यांना कर कपातीनंतर सुमारे ६३ लाख रुपये मिळतील.