Parbhani Latest News : परभणी जिल्ह्यातील वसमत महामार्गावर आयटीसी चौफुलीसमोर दर्शनाहून परत येत असताना अॅक्टिवा दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने दोन मुलींचे प्राण वाचले आहेत.

हायलाइट्स:
- दर्शनाहून येताना दुचाकीने अचानक घेतला पेट
- सुदैवाने या घटनेत दोन मुलींचे प्राण वाचले
- परभणीतील वसमत महामार्गावर घडली घटना
त्रिधारा देवस्थानाचे दर्शन घेऊन दोन मुली अॅक्टिवा गाडीवरून परभणी शहराकडे येत होत्या. याचवेळी गाडी वसमत महामार्गावरील आयटीसी चौफुलीसमोर आली असता गाडीने अचानक पेट घेतला. ही बाब पाठीमागून येणाऱ्या ऑटो चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गाडीला ओव्हरटेक करून गाडीवरील मुलींना आग लागली असल्याची माहिती दिली. त्यामुळे मुलींनी गाडी बाजूला थांबून खाली उतरल्या असता गाडीने मोठा पेठ घेतला.
ऑटो चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे अॅक्टिवा गाडीवरील दोन्ही मुलीचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, आगीमुळे गाडी जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गाडीने पेट घेतल्याची घटना घडल्यानंतर वसमत महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network