मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० सेना आमदारांनी बंड करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन उद्धव ठाकरे यांना खाली खेचलं. त्यानंतर राष्ट्रपतीपदाची निवडणूक होताच खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात १२ खासदारांनी देखील उद्धव ठाकरे यांची सोडली. खासदारांचं मन वळविण्यात भावना गवळी यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. पण सध्या हाती आलेल्या बातमीनुसार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर सुर्वे यांनीही सेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. उद्धव ठाकरे यांनी प्रशांत सुर्वे यांच्या हाती शिवबंधन बांधलं.

प्रशांत सुर्वे यांचा २००४ साली भावना गवळी यांच्याशी विवाह झाला होता. ९ वर्ष सुखी संसार केल्यानंतर त्यांनी काही कारणांनी २०१३ साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २०१३ सालीच त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. त्यानंतर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भावना गवळी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र या निवडणुकीत प्रशांत सुर्वे यांना अपयश आलं. त्यांचा पराभव झाला होता.

शिवसेना प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना गिफ्ट, उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी जबाबदारी
प्रशांत सुर्वे हे एयर इंडियात फ्लाइट कॅप्टन म्हणून कार्यरत होते. भावना गावळींशी विवाह झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली होती. मात्र घटस्फोटानंतर त्यांनी काही खाजगी कंपन्यांमध्ये फ्लाईट कॅप्टन म्हणून काम केलं आहे. ते सध्या राजकारणात फार सक्रिय नसले तरी अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. मतदार संघातही अनेक जुन्या शिवसैनिकांशी त्यांचा संपर्क कायम आहे.

दरम्यान, मोठ्या काळानंतर प्रशांत सुर्वे राजकारणात सक्रिय झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे इकटे पडल्याचं चित्र निर्माण झालेले असताना शिवसेनेत देखील ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी एनकमिंग सुरु झालं आहे. आज सुषमा अंधारे आणि प्रशांत सुर्वे यांनी उद्धव ठाकरे यांच्या साथीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
Shivsena: ‘मातोश्री’साठी खास संदेश; ‘उद्धवजी को हमारा पैगाम देना, तमाम मुस्लीम कौम आपके साथ है’
सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंकडून उपनेतेपदाचं गिफ्ट

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या तथा परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण मी त्यापैकी नाहीये. ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करतीये. मला पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाहीये. फक्त देशाचं संविधान वाचविण्यासाठी मला भाजपविरोधात लढायचं आहे, अशा भावना सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावेळी केल्या. तर उद्धव ठाकरेंनी देखील सुषमा अंधारे यांना शिवसेना प्रवेशाचं गिफ्ट दिलं. पक्षात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी दिली. यावेळी आगामी काळात ग्रामीण भागांतून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here