voter card apply online, मतदान कार्डसाठी आता वयाच्या ‘या’ वर्षीच अर्ज करता येणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय – election commission decision now application for voter card can be made in 17 year only
नवी दिल्ली : आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण निवडणूक आयोगाने यासंबंधी महत्त्वाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार, १७ वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण यासाठी अर्ज करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त (Election Commissioner) अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यांच्या सीईओ/ईआरओ/एईआरओना यासंबंधी निर्देश दिले आहेत. ज्यामुळे १७ वर्षीय तरुणांचेही आता मतदार यादीत नाव असणार आहे. अर्ज करण्याची सुविधा मिळेल.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार, आता मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तरुणांना १ जानेवारी रोजी १८ वर्षे वयोमर्यादा पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. आता १७ वर्षांहून अधिक वयाची यादी करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. Monkeypox : सेक्स, मिठी ते किसिंग… मंकीपॉक्स रोखण्यासाठी गाइडलाइन्स जारी, आताच व्हा सावध मतदार यादी आधारशी लिंक करण्याचा प्रयत्न… मतदार यादी आधारशी जोडण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबवून मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाचे आधार क्रमांक लिंक केले जाणार आहेत. २०२३ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेतून सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचा आधार क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मतदारांची नावं आधार क्रमांकाशी जोडल्यानंतर मतदार यादीत डुप्लिकेट नावं राहणार नाहीत. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल तर त्याला प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
आधार कार्ड क्रमांक ऑनलाइनही देता येईल… मिळालेल्या माहितीनुसार, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन मतदारांकडून आधार कार्ड क्रमांक मिळवतील. ते नवीन फॉरमॅटमध्ये येणाऱ्या फॉर्म ६-B वर आधार कार्डचा नंबर टाकतील. क्रमांक मिळाल्यानंतर आठवडाभरात मतदाराच्या नावाशी आधार कार्ड क्रमांक लिंक होईल. मतदारांना आधार कार्ड क्रमांक ऑनलाइनही देता येणार आहे. यासाठी फॉर्म 6-बी ऑनलाइन देखील उपलब्ध असेल.