मुंबई : ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील ‘मलखान’ हे पात्र साकारणारा अभिनेता दीपेश भान (वय ४१) या अभिनेत्याचं शनिवारी सकाळी निधन झालं. त्याच्यामागं पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. शुभांगी अत्रेने दीपेशचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळं झाल्याची पुष्टी केली आहे.

जिममध्ये वर्कआउट करून आल्यानंतर मुंबईतील दहिसर इथं राहत्या घराच्या बिल्डिंगखाली क्रिकेट खेळताना दीपेश अचानक कोसळला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथंच त्याचा मृत्यू झाला. दीपेशच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रानं महत्त्वाचा खुलासा केला आहे.
मिलिंद सोमणने १०० फूट खोल समुद्रात पत्नीसह मारली उडी, पाण्यातही अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज
दीपेशची तब्येत इतकी उत्तम होती, की त्यांनी कधीही मद्यसेवन केलं नाही किंवा सिगारेटला स्पर्शही केला नाही, इतकंच नव्हे तर १०-१२ दिवसांपूर्वीच त्यानं बॉडी चेकअप करून घेतलं होतं, असा खुलासा दीपेशच्या एका मित्रानं केला
आहे.
शिकलेल्या महिलाही नवऱ्यासाठी उपास-तापास करतात तेव्हा…रत्ना पाठक यांचं वक्तव्य वादात
‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआयआर’, ‘चॅम्प’ आणि ‘सन यार चिल मार’ या दीपेशच्या काही गाजलेल्या टीव्ही मालिका होत्या. अनेक सेलिब्रेटींनी दीपेशला श्रद्धांजली वाहिली आहे.

दीपेशचा तो शेवटचा क्षण
दीपेशच्या प्रार्थना सभेमध्ये दीपेश भान यांच्या मित्रानं झैन खान यानं त्यांच्या शेवटच्या क्षणाबद्दल सांगितलं. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जैन यानं सांगितलं की, ‘त्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास दीपेश माझ्याकडे आला. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. खाली सर्वजण खेळत होते त्यासाठी मला तो बोलावायला आला होता. खरं तर शनिवारी आम्ही खेळायचो नाही कारण दीपेशचं चित्रीकरण असायचं. परंतु त्या दिवशी दीपेशचं चित्रीकरण उशीरा होतं त्यामुळे तो खेळण्यासाठी बोलावायला आला होता. तो सगळ्यांना खूप मदत करायचा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here