corona news maharashtra, आवश्यक सूचना! करोना लस घेतलेल्यांना मिळणार ५००० रुपये? वाचा काय आहे सत्य – government scheme is giving 5000 rupees to covid vaccinated people is fake news
नवी दिल्ली : सध्या व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया अॅप्सवर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जातोय की ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत. त्यांना “पंतप्रधान लोककल्याण विभाग” कडून ५ हजार रुपये दिले जात आहेत. यामुळे अनेकजण गोंधळात असून आम्ही याबद्दल खरी माहिती सांगणार आहोत.
अधिक तपास केला असता अशी कोणतीही योजना कोणत्याही खात्याने किंवा सरकारने चालवली नाही. त्यामुळे तुम्ही अशा अफवांना बळी पडू नका. लुटमार करण्यासाठी मेसेज व्हायरल केला जात आहे. असे मेसेज व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही फसवणूक करणारे अनेक मेसेज व्हायरल करून लोकांची फसवणूक झाली आहे. या व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, “एक महत्त्वाची माहिती – ज्यांना लस मिळाली आहे, त्यांना पंतप्रधानांच्या लोककल्याण विभागाकडून ५००० रुपये दिले जात आहेत, जर तुम्हालाही करोनाची लस मिळाली असेल, तर आताच फॉर्म भरा आणि ५००० रुपये मिळवा. https://pm-yojna.in/5000rs या लिंकवरून फॉर्म भरा. कृपया लक्षात ठेवा – ५००० रुपये फक्त ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत उपलब्ध असतील!”
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज खरा नसून यामध्ये अनेक चुकाही केल्या आहेत. त्यामुळे ही माहिती खोटी आहे. दुसरे म्हणजे, संबंधित लिंक अधिकृत नसून कोणत्याही सरकारी वेबसाईटच्या लिंकवर Gov चा उल्लेख नक्कीच असतो. उदाहरणार्थ, https://pmjdy.gov.in/. ही लिंक प्रधानमंत्री जनधन योजनेच्या वेबसाईटची आहे. गुंडांनी या लिंकमध्ये PM आणि Yojna असे शब्द टाकले असले तरी, अतिशय हुशारीने प्रस्तावना दिली आहे, जेणेकरून सामान्य लोक सहज फसतील.
वेबसाईटवर पंतप्रधानांचा फोटो…
तुम्ही या लिंकवर क्लिक करताच, या वेबसाइटवर तुम्हाला तुमचे नाव, तुम्ही कोणती लस घेतली, कुटुंबातील एकूण सदस्य आणि मोबाईल नंबर याविषयी माहिती विचारली जाते. खरंतर, त्यांना तुमचा फोन नंबर हवा आहे, ज्यावर हे लोक नंतर फोन करतात आणि त्यांना आमिष दाखवतात आणि ५००० रुपये मिळवून देण्याच्या बदल्यात काही रुपये उकळतात. त्यामुळे अशा अफवांपासून तुम्ही सावध राहा. धक्कादायक! साताऱ्याला जाताना मुंबईच्या व्यापाऱ्याची गाडी अडवली, एकाने पिस्तूल रोखली आणि…