उन्नाव: उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका महिलेनं पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला आहे. पोलिसांना मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. दारूडा पती दररोज आपल्याला आणि लेकीला मारहाण करायचा, असं महिलेनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

महिलेनं तिच्या आत्महत्येसाठी पतीला जबाबदार धरलं आहे. माझ्या लेकीला पतीपासून दूर ठेवा, असं तिनं चिठ्ठीत म्हटलेलं आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी एफआयआर दाखल करून पतीला ताब्यात घेतलं आहे.
संदीप कोरगावकरची आत्महत्या; पोलिसांनी चक्रं फिरवली अन् तब्बल ३०० कोटींचा घोटाळा उघड
उन्नाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहल्ला जुना बाजारात राहणाऱ्या मोहित गुप्ताचा विवाह २०१५ मध्ये आराधना यांच्याशी झाला. मोहित दररोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करायचा असा आरोप आहे. याच त्रासाला कंटाळून आराधना यांनी बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. त्यात महिलेनं तिच्या पतीला आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. माझ्या मुलीला वडिलांपासून दूर ठेवा, असं आराधना यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. पतीला कठोर शिक्षा देण्यात यावी. मला माझ्या मुलीला पोलीस दलात पाठवायचं आहे, असंही महिलेनं चिठ्ठीत नमूद केलं आहे.
धक्कादायक! ओव्हरटेकिंगवरून वाद; कावड यात्रेकरूंची जवानाला बेदम मारहाण; अर्ध्या तासात मृत्यू
पोलिसांनी मृत महिलेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पतीला ताब्यात घेतलं. एफआयआर दाखल करून पुढील कारवाई केली जात असल्याचं पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी सांगितलं. आराधना यांची हत्या गळा दाबून झाली असल्याचा आरोप त्यांचे वडील राजेश गुप्ता यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here