बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे आता उघड झाले आहे. सांगण्यात आले, परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. त्यावेळी विमानतळावर मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कुणीही नव्हते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळात किती सदस्य असावे, तसेच मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा, यावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माध्यमांना हुलकावणी देण्यासाठी दौरा रद्द झाल्याची बातमी पेरण्यात आल्याचे समजते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गुरुवारी दुपारी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.
दोन-तीन दिवसांत विस्तार- गिरीश महाजन
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसातच होईल, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना केला. ते सध्या दिल्लीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही त्यांनी केला.