love sex crime news, पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने रचला भयंकर कट, ३ मित्रांना दारू पाजली आणि… – crime news man hatches conspiracy to kill 3 friends suspected of having physical relationship with wife
जांजगीर : छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यातील बलोदा पोलीस स्टेशन हद्दीतील गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे राहणाऱ्या तीन तरुणांनी १८ जून रोजी दारूचे सेवन केले होते. दारू पिऊन काही वेळातच तिघांना उलट्या होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तत्काळ तिघांनाही रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं पण एकाचा यामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी पोलीस खात्याकडे करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या सापडल्या, ज्या पोलिसांनी जप्त केल्या. एफएसएल टीमच्या अहवालातून पोलिसांना धक्कादायक खुलासा झाला आहे. दारूच्या बाटलीत आणि मृताच्या दारूमध्ये कीटकनाशक (विष) मिसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आवश्यक सूचना! करोना लस घेतलेल्यांना मिळणार ५००० रुपये? वाचा काय आहे सत्य तपासात मोठी माहिती उघड…
जंजगीरचे एएसपी निकोलस खाल्खो यांनी सांगितले की, दारूमध्ये विष मिसळण्यात आले होते. त्यानंतर तपास केला असता वीटभट्टी चालवणाऱ्या मिलन प्रजापती असे नाव समोर आले. मिलनने पार्टी ठेवली होती आणि त्यानेच मित्रांना विषारी दारू पाजली. पोलिसांनी मिलनची कसून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मृत सत्यम कौलचा मामा रामकुमार कौल याच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची भीती असल्याने त्याने प्लॅन करून तिघांचा काटा काढण्याचं ठरवलं.