woman dies after eating tomato laced with rat poison: मालाड पश्चिमेला असलेल्या मालवणी परिसरात एक विचित्र प्रकार घडला आहे. टीव्ही पाहण्याच्या नादात एका महिलेनं विषारी औषध लावण्यात आलेला टोमॅटो खाल्ला. त्यानंतर आठ दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला. रेखादेवी निशाद असं महिलेचं नाव आहे.

 

rat and tomato
विषारी टोमॅटो खाल्ल्यानं महिलेचा मृत्यू
मुंबई: मालाड पश्चिमेला असलेल्या मालवणी परिसरात एक विचित्र प्रकार घडला आहे. टीव्ही पाहण्याच्या नादात एका महिलेनं विषारी औषध लावण्यात आलेला टोमॅटो खाल्ला. त्यानंतर आठ दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला. रेखादेवी निशाद असं महिलेचं नाव आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

रेखादेवी यांच्या घरात उंदरांचा सुळसुळाट वाढला होता. त्यामुळे उंदिर मारण्यासाठी त्यांनी टोमॅटोला विषारी औषध लावलं. दुपारच्या सुमारास रेखादेवी टीव्ही पाहात होत्या. टीव्ही पाहण्यात मग्न असताना त्या मॅगी बनवत होत्या. टीव्ही पाहता पाहता त्यांनी विषारी औषध लावलेला टोमॅटो मॅगीमध्ये वापरला.
नवऱ्याला कठोर शिक्षा द्या; लेकीला त्याच्यापासून लांब ठेवा! चिठ्ठी लिहून महिलेची आत्महत्या
काही वेळानंतर रेखादेवींना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रेखादेवी निशाद मालवणीच्या मार्वे रोड येथील पास्कलवाडीत वास्तव्यास होत्या. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here