नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात आफ्रिकन देशांतील मंकीपॉक्सच्या जुन्या रूग्णांमध्ये या आजाराची आणखी काही लक्षणे समोर आली आहे. नवीन प्रकरणांमध्ये समोर आलेली लक्षणं अगदी वेगळी आहेत. मंकीपॉक्सच्या नवीन रुग्णांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यांची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया.
१९७ लोकांवर केली स्टडी…ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, लंडनमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेल्या १९७ लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये १९६ लोक हे गे, बायसेक्शुअल किंवा पुरुषांसोबत सेक्स करणारे लोक आहेत. २००७ ते २०११ दरम्यान डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आणि २०१७ ते २०१८ दरम्यान नायजेरियामध्ये आलेल्या मंकीपॉक्सच्या रुग्णांची लक्षणं वेगळी असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे. मात्र, आता पुढे येणाऱ्या रुग्णांना गुदाशयात दुखणं आणि लिंगात सूज आल्याचे प्रकार समोर येत आहेत.
काय आहेत नवी लक्षणं…मंकीपॉक्सच्या सामान्य लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर ताप, घसा खवखवणे आणि खोकला, डोकेदुखी, स्नायू दुखणे किंवा थकवा जाणवणे. याशिवाय शरीराच्या कोणत्याही भागात किंवा संपूर्ण भागात पुरळ उठते. शरीरात गुठळ्या होणे हे देखील मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये आढळते. अशा परिस्थितीत, संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. कारण हा आजार एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णात पसरतो. म्हणून, संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क करू नका किंवा कोणत्याही प्रकारची लैंगिक क्रिया करू नका.