राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आणखी एका राजीनाम्याने खळबळ – chief minister eknath shinde shock to ncp state vice president resigns
परभणी : राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनाम्यामध्ये नमूद केलं आहे. ते आता एकनाथ शिंदे गटामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबतच आता राष्ट्रवादीला देखील धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ते शिंदे गटात सामील होणार का? अशा चर्चेला उधाण आलं असताना त्यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. तर आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे जयंत पाटील यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. आधी कंडोम आणि आता…, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या BJP नेत्याच्या फार्महाऊसवर सापडल्या धक्कादायक वस्तू यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. पुराचे पाणी शेतातील त्यामुळे शेतजमीन खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची गरज असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी खासदार अॅड. सुरेश जाधव व माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. लंगोटे यांनी शिंदे यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तर या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे ते आता शिंदे गटात सामील होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.