सखी गोखलेच्या टॅटूमागचं कारण वाचलंत तर डोळ्यात पाणी येईल!
सामंथा आणि नागा यांचा घटस्फोट जाहीर झाला. त्यानंतर सामंथानं नागाकडे २०० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याची बातमी समोर आली होती, परंतु खुद्द अभिनेत्रीचं याबाबत खुलासा करताना हे खोटं असल्याचं सांगितलं. आता पुन्हा एकदा सामंथा आणि नागा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अभिनेता मुरली मोहन यांनी सांगितलं की, सामंथानं नागाचं एक घर विकत घेतलं आहे. घटस्फोट होण्यापूर्वी हे दोघंजण याच घरात रहात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामंथानं हे घर भरभक्कम रक्कम देऊन विकत घेतलं आहे.
सामंथाचे नवीन घर
अभिनेत्रीने (सामंथा रुथ प्रभू) डेहराबादमध्ये घेतलेलं घर अनेक अर्थाने खास आहे. सामंथा तिच्या माजी पती नागा चैतन्यसोबत राहत असलेल्या घराच्या मालकाने अलीकडेच उघड केले की जोडप्याने विभक्त झाल्यानंतर घर विकलं होतं. पण त्यानंतर अभिनेत्रीने आता घर मालकाशी बोलून ते घर पुन्हा स्वतः विकत घेतलं. सध्या ती तिच्या आईसोबत तिथे राहते.
गश्मीर महाजनीचा स्वार्थ! एका फायद्यासाठी स्वीकारली ऑफर

दरम्यान, सामंथाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं तर ती ‘शकुंतलम’, ‘यशोदा’ आणि ‘खुशी’ या सिनेमांत दिसणार आहे. तसंच सामंथा लवकरच तापसी पन्नू हिच्याबरोबर एका सिनेमात दिसणार आहे. अलिकडेच सामंथा करण जोहर याच्या कॉफी विथ करण ७ कार्यक्रमात (Koffee With Karan) अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्याबरोबर सहभागी झाली होती. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार सामंथा आयुष्मान खुराना याच्याबरोबर लवकरच बॉलिवूडमधील एका सिनेमात दिसणार आहे. तर नागा चैतन्यदेखील आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधव