मुंबई : मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात चार जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती, पत्नी आणि दोन मुलांचे हे मृतदेह असून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.

दरम्यान, एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी तपास करत असल्याची माहिती आहे. लीस घटनास्थळी दाखल झाले असून आधी मुलांना विष देऊन नंतर पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर झोपडपट्टीत फैजाने मज्जिदच्या पाठीमागे, रोड नंबर १४, पदमा नगर चौकी समोरील झोपडपट्टी, बैंगनवाडी, शिवाजीनगर, गोवंडी इथं हे मृतदेह आढळले आहे. घराच्या आतमध्ये मृतदेह होते तर दरवाजाला आतून कडी लावून घेतली होती. त्यामुळे ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये मृतांची नावंही समोर आली आहेत.

मृतांची नावं…

१) शकील जलील खान, वय ३४ वर्ष
२) रजिया शकील खान, वय २५ वर्ष
३) कुमार सरफराज शकील खान, वय ०७ वर्ष
४) कुमारी अतिसा शकील खान, वय ०३ वर्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आणखी एका राजीनाम्याने खळबळ
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. याध्ये ७ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीचा मृतकांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत.

आधी कंडोम आणि आता…, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या BJP नेत्याच्या फार्महाऊसवर सापडल्या धक्कादायक वस्तू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here