सलमाननं बदलली आपली कार
काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खाननाही धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यानंतर अभिनेता मुंबई पोलीस आयुक्तांना भेटला. त्यानं हत्यार बाळगण्याच्या लायसन्ससाठी अर्ज केला आहे. दरम्यान, सलमाननं त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यानं आपली कार अपग्रेड केली आहे. तो आता पांढऱ्या रंगाच्या बुलेटफ्रूफ कारमधून फिरतो. ही लँड क्रूझर आहे. त्याच्याबरोबर शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांचा ताफाही असतो. याआधी तो लँड रोवरमधून फिरायचा.

लाॅरेन्स बिश्नोईचा सलमानवर का आहे राग?
सलमाननं राजस्थानमधल्या जोधपूर इथे काळ्या हरिणाची शिकार केली, असा त्याच्यावर आरोप आहे. काळं हरीण बिश्नोई समाजासाठी पवित्र मानलं जातं. म्हणून त्यानं ही धमकी दिली आहे.
सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकावण्यात बिश्नोई टोळीचाच हात आहे. राजस्थानमधील जालोर येथून तीन जण मुंबईत आले होते. ज्यांनी सलमान आणि त्याचे वडील सलीम यांच्यासाठी घराजवळ धमकीचे पत्र सोडले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीनजणांची ओळख पटवली.
पुन्हा ट्रोल- आमिरचा फोटो लीक, सिगारेट ओढताना दिसला अभिनेता
याप्रकरणी सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ महाकाळ याची चौकशी केली असता पोलिसांना ही माहिती मिळाली. महाकाल हा देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकालने सांगितले की, बिश्नोई टोळीचा कुख्यात गुंड विक्रम ब्रार याचे या संपूर्ण प्रकरणात हात असल्याचं हा धमकीचं पत्र घेऊन सलीम खानच्या घरी गेला होता.
जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधव