घराच्या गॅलरीमध्ये सगळे जण तडफडत होते. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाऊ लागलो. त्यावेळी आम्हाला रुग्णालयात जायचं नाही. आम्हाला सोडून द्या, असं ते म्हणत होते. त्यांचे उद्गार ऐकून आम्हाला धक्काच बसला. त्यांना रुग्णालयात का जायचं नाहीए, असा प्रश्न आम्हाला पडला होता. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिघांचाही मृत्यू झाला, असं लवकुश यांनी सांगितलं.
आत्महत्येपूर्वी शैलेंद्र कुमार यांनी एक केक मागवला होता. त्यांनी केक कापला. केक कापतेवेळी त्यात सल्फर मिसळण्यात आलं. आपल्याला पुढील जन्मदिनाच्या शुभेच्छा, असं शैलेंद्र केक खाल्ल्यानंतर पत्नी आणि मुलीला म्हणाले. केक खाल्ल्यानंतर तिघे तडफडू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला.
शैलेंद्र कुमार यांनी त्यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीला फोन केला होता. आता जगू शकत नाही. केक कापून जन्मदिन साजरा करणार आहोत, असं शैलेंद्र फोनवर म्हणाले. समोरील व्यक्तीला याचा नेमका अर्थ कळला नाही. त्यानं ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस घरी पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता.