मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नुकतीच ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सूत्रसंचालक सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी एका सेगमेंटमध्ये सुप्रियाताईंना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी प्रतिकात्मक संवाद साधण्यास सांगितलं. माझे वडील पवार, तर आई माहेरची शिंदे, त्यामुळे आमच्याही घरात पवार विरुद्ध शिंदे होणार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“एकनाथजी, कसे आहात? तुम्ही कमी बोलता आणि मी बोलतच राहते. त्या दिवशी आपली उद्धवजींच्या केबिनमध्ये भेट झाली, तेव्हा तुम्ही बोललाच नाहीत आपण सुरतला जाताय ते, विधानभवनात तर भेटलो असतो. पण आता घरी मी चिडवत असते की आपल्याही घरात आता पवार विरुद्ध शिंदे होणार
पवार माझे वडील, आणि माझी आई माहेरची शिंदे. परवा मी दादाला सांगितलं, आता किती मजा येणार ना, पवार विरुद्ध शिंदे. बाबा जिंकणार की आई, हे आता काळच ठरवेल” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“आपला श्रीकांत मला खूप प्रिय आहे, खूप गोड मुलगा आहे. परवा मला भेटला संसदेत. तुम्ही दिल्लीत आला पण भेट नाही झाली. आणि बघा काय ते चिन्हाचं वगैरे, उरकून टाका जरा कामाला लागूया. सव्वा महिना झाला, माझ्या कामांचा खोळंबा झालाय. अधिकारी म्हणतात मंत्रीच जागेवर नाहीत. माझ्या
मतदारसंघातील खूप कामं अडकली आहेत. तुम्ही कमी बोलता, मला दडपण येतं, वनवेच आपलं नातं आहे असं वाटतं, खूप खूप शुभेच्छा, जय महाराष्ट्र” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी संवाद संपवला.

Supriya Sule Eknath Shinde

सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंशी संवाद

चंद्रकांत पाटलांशी संवाद

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘घरी जाऊन स्वयंपाक करा’ असा सल्ला सुप्रिया सुळेंनी दिल्यानंतर वादाचा धुरळा उठला होता. चंद्रकांत पाटलांनी नंतर त्यावरुन माफीही मागितली. यावरुन सुबोध भावेंनी सुप्रियांना प्रतिक्रिया विचारली. ‘मला वाईट वाटलं नाही, होममेकर असल्याचा मला सार्थ अभिमानच आहे. घरी स्वयंपाक करण्यात मी कमीपणा समजत नाही. कारण आपल्याला कुठेही घरचंच जेवण लागतं. विरोधकांचं बोलणं मी मनाला लावून घेत नाही. चंद्रकांतदादांना प्रेमाने नमस्कार’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्यानंतर एकनाथ शिंदेंप्रमाणेच चंद्रकांत पाटलांच्या तस्वीरीशी संवाद साधण्यास सुप्रिया सुळेंना सांगण्यात आलं. ‘हल्ली केंद्राचा नीट निधी मिळत नाही,
मोदीसाहेबांनी कट लावलाय, सांगा जरा त्यांना. अमित शाह यांच्याशी बोलताना आधी दडपण यायचं, आता सवय झाली, चांगलं बोलतात ते पार्लमेंटमध्ये, माझ्या डिबेटलाही ते हजर असतात, त्यांच्याशी डिबेटला मजा येते. पुण्यात तुम्हाला बरं वाटतंय, कोल्हापूर पण छान शहर आहे. शाहू महाराजांमुळे मला ते फार आवडतं. तुम्हाला शिफ्ट जाणवत असेल ना कोल्हापूर, पुण्यातून निवडणूक लढवताना. वहिनींना सांगा विचारलंय म्हणून आणि लवकर घरी जेवायला या, तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी करते, असं आमंत्रणच सुप्रिया सुळेंनी चंद्रकांतदादांना दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here