ठाणे : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आता उभारी घेताना दिसत आहे. शिवसेनेतील अनेक कट्टर समर्थकांनी, बड्या नेत्यांनी सेनेला रामराम करत शिंदेंचा हात धरला. पण आता यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेगळीच भीती सतावत आहे. ठाण्यात शिंदे गटाला सुरूंग लागेल अशी भीती शिंदेंना आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यात शिंदे गटाने समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह हातातून जाऊ नये अशी धास्ती वाटू लागली आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेनेच्या शिंदे समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे.

शिवसेना मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लान; जे आदित्य ठाकरेंनी केले तेच पुन्हा…
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता शिंदे गटालादेखील शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हातातून जाऊ नये याची धागाधुक लागल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील शिंदे समर्थकांकडून आज प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. ठाण्यातील शिंदे समर्थक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे समर्थकांकडून पतीज्ञापात्र लिहून घेतले आहे. उद्धव ठाकरे यांनी मविआसी केलेली आघाडी चुकीची होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या वेगळ्या गटाला आमचा पाठिंबा आहे, असं या प्रतिज्ञापत्रात लिहून घेतले जात आहे. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या निवास स्थानावर म्हणजेच शिवसैनिकांचे आनंद मठ इथे हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाला सर्वांकडून प्रतिज्ञा पत्र भेट म्हणून मागवले होते. त्याला अनेक शिवसैनिकांनी प्रतिसाद देखील दिला होता. त्याला टक्कर देत ठाण्यात देखील शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र आज भरून घेतले जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शिंदे समर्थक नगरसेवक आणि पदाधिकारी त्यासाठी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आणखी एका राजीनाम्याने खळबळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञा पत्र महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिंदे गटाला देखील शिवसेना पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह हातून जातंय की काय? आणि याच धास्तीपोटी शिंदे गटाकडून हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल जातंय की काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

आवश्यक सूचना! करोना लस घेतलेल्यांना मिळणार ५००० रुपये? वाचा काय आहे सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here