सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानसेवेंतर्गत मुंबईहून औरंगाबादसाठी सकाळी सात वाजता विमान निघेल. हे विमान औरंगाबादला आठ वाजून दहा मिनिटांनी पोचेल. औरंगाबादहून मुंबईकडे आठ वाजून पन्नास मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल. तर ते मुंबईला सकाळी दहा वाजता पोहोचेल.
तसेच, दिल्लीहून औरंगाबादसाठी पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी एअर इंडियाचे विमान निघेल. हे विमान सकाळी सव्वासात वाजता औरंगाबादला पोहोचेल. औरंगाबादहून दिल्लीकडे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी निघेल. निघालेले हे विमान पावणेदहा वाजता दिल्लीत पोहोचेल. औरंगाबादहून दिल्ली व मुंबईसाठी एअर इंडियाची सायंकाळी असलेली विमानसेवा मात्र बंद राहणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे वेळापत्रक राहणार आहे.