Eknath Shinde vs Ajit Pawar | पूरग्रस्त भागातील सगळे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही खंबीर असले तरी ३६ जिल्ह्यांत पालकमंत्री नेमले असते तर ते तिकडे जाऊन आढावा घेऊ शकले असते. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी, ‘हा कधी गेला, तो कधी गेला’, असे बालीश प्रश्न विचारले जात आहेत.

 

Ajit Pawar Eknath Shinde (2)
अजित पवार आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • मी विरोधी पक्षनेता म्हणून दौरा करतोय
  • मी हाडाचा शेतकरी आहे
  • मी दौऱ्यासाठी कधी जावं हा माझा प्रश्न आहे
मुंबई: राज्यातील पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) सध्या अतिवृष्टी झालेल्या भागांचे दौरे करत शेतकऱ्यांच्या मदतीवरून नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत आहेत. पूरग्रस्त भागात सरकार पोहोचत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले होते. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष पूरस्थिती असताना दौरे केले होते. आम्ही त्यावेळेलाच पंचनामे करण्याचे आदेश आणि इतर महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. अजित पवार हे आता पूर ओसरल्यानंतर या भागांमध्ये जात आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

एकनाथ शिंदे यांच्या या खोचक टीकेनंतर अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनीही तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली. मी विरोधी पक्षनेता म्हणून दौरा करतोय. मी हाडाचा शेतकरी आहे. मी दौऱ्यासाठी कधी जावं हा माझा प्रश्न आहे. इतरांनी नाक खुपसू नये. आज मुख्यमंत्री पण म्हणाले अजितदादा उशीरा गेले. हे असले प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असा पलटवार अजित पवार यांनी केला.
पेरलेलं उगवलंच नाही, शेतकऱ्याचा घरासमोरच गळफास, उस्मानाबाद हळहळलं
पूरग्रस्त भागातील सगळे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही खंबीर असले तरी ३६ जिल्ह्यांत पालकमंत्री नेमले असते तर ते तिकडे जाऊन आढावा घेऊ शकले असते. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी, ‘हा कधी गेला, तो कधी गेला’, असे बालीश प्रश्न विचारले जात आहेत. त्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, असे अजित पवार यांनी म्हटले.

राज्यात तुमच्या विचारांचं सरकार आलं, आतातरी केंद्र सरकारने मदत करावी: अजित पवार

यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारलाही टोला लगावला. आता महाराष्ट्रात केंद्राच्या विचाराचे सरकार आले आहे. आतातरी केंद्र सरकारने मदत करावी. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी आमची मागणी आहे. तसेच यंदाचे पीक कर्जही माफ करायला हवे, असे अजित पवार यांनी म्हटले.

“कुणाला काहीच नाही मिळालं साहेब…”, अजित पवारांसमोरच शेतकरी ढसाढसा रडला

लोकांच्या वेदना जाणण्यासाठी दौरे करायचे असतात, स्वागत-सत्कारासाठी नव्हे: शरद पवार

राज्यकर्त्यांनी साधारणत: संकटग्रस्त लोकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी दौरे करायचे असतात. स्वागत-सत्कारासाठी दौरे करायचे नसतात, अशी अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून संबंधित भागांना भेटी दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील अनेक भागांचे दौरे करत आहेत. मात्र, त्यांचे दौरे हे शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातच होत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. याविषयी शरद पवार यांनी विचारणा करण्यात आली असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाब्दिक चिमटे काढले. ते शुक्रवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here