girl falls to death from 7th floor in vasai: सातव्या मजल्यावरून पडून एका साडेतीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

 

girl falls from 7th floor
बाल्कनीतून पडल्यानं साडे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
वसई : सातव्या मजल्यावरून पडून एका साडेतीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

वसई पश्चिमेकडील अग्रवाल सिटीमधील इमारतीच्या सातव्या मजल्यावर महाजन कुटुंब राहते. या कुटुंबात राहणाऱ्या श्रेया महाजन या मुलीचा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी आई श्रेयाच्या मोठ्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. त्यावेळी श्रेया घरामध्ये तिच्या आजीसह होती.

बाल्कनीत असलेल्या श्रेयाच्या हातून मोबाईल खाली पडला. तो पाहण्यासाठी ती बाल्कनीतून वाकली असता तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील बर्थडेच्या शुभेच्छा! केकमध्ये सल्फर मिसळलं, पत्नी, मुलीसह इंजिनीयरची आत्महत्या
सकाळी सव्वा सातच्या सुमारास श्रेया झोपेतून उठली. त्यावेळी तिची आई मोठ्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. झोपेतून उठल्यावर श्रेयाला आई दिसली नाही. आईला शोधण्यासाठी ती बाल्कनीत गेली. तेव्हा तिच्या हातात आईचा मोबाईल होता. रेलिंगमधून मोबाईल खाली पडला. त्यानंतर श्रेया रेलिंगवर चढली. तिचा तोल गेला आणि ती खाली पडली.
वंशाच्या दिव्यासाठी आईला लेकींसमोर जिवंत पेटवलं; पोरींनी बापाला जन्माची अद्दल घडवली
श्रेया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अवघ्या साडे तीन वर्षांची लेक गमावल्यानं महाजन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेजाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here