बागेश्वर : उत्तराखंडमधील बागेश्वर इथे ज्युनियर हायस्कूल (रायखोली) च्या काही विद्यार्थिनी शाळेत येताच अचानक रडू लागल्या आणि थोड्या वेळात बेशुद्ध झाल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून यामुळे संपूर्ण शाळेत खळबळ उडाली. यानंतर तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनींना चक्कर येताच डॉक्टरांना फोन करण्यात आला. त्यांच्यावर उपाचर झाले. वैद्यकीय पथक तपासणीसाठी शाळेत पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीनंतर असं समोर आलं आहे की, सगळ्यांनाच हादरा बसला. शाळेत येण्याआधी ८ मुलांनी (विद्यार्थ्यांनी) फासावर लटकलेला मृतदेह पाहिला होता, त्यामुळे ते घाबरले होते आणि यामुळे त्या बेशुद्ध झाल्याची माहिती जिल्हा मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांकडून (CMHO) देण्यात आली.

Monkeypox Symptoms : मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसली नवी लक्षणे, गंभीर आजाराने चिंता वाढवली
बागेश्वर येथील रायखोली ज्युनिअर हायस्कूलमध्ये गुरुवारी ६ वीच्या वर्गातील ८ विद्यार्थिनी आणि दोन मुलं अचानक किंचाळून रडू लागले. यानंतर अचानक बेशुद्ध पडल्याने गोंधळ उडाला. यानंतर शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थिनींची तातडीने काळजी घेत त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थिनींना घरी पाठवले.

काही लोक या घटनेला मास हिस्टेरिया म्हणत होते. याआधीही शेजारील अल्मोडा, पिथौरागढ, चमोली या जिल्ह्यांतील सरकारी शाळांमधून अशा घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर डॉक्टरांच्या पथकाने दोन दिवस ज्युनिअर हायस्कूलमध्ये जाऊन समुपदेशन केल्यानंतर शाळकरी विद्यार्थिनींवर उपचार केले. या घटनेनंतर शाळेत भीतीचे वातावरण असले तरी शाळेतील शिक्षकांनी इतर मुलांना न घाबरता शाळेत येण्याच्या सूचना दिल्या.

आधी कंडोम आणि आता…, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या BJP नेत्याच्या फार्महाऊसवर सापडल्या धक्कादायक वस्तू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here